एका बगलेत संविधान आणि दुसऱ्या बगलेत मनुस्मृती ठेवून तुम्ही देश घडवू शकता का?

या विकृत वृत्तीवर न्या. रानडे यांनी अचूक भाष्य केले आहे. रानडे लिहितात, "तुम्हाला एकीकडे राजकारणात क्रांतिकारी भूमिका आणि दुसरीकडे धार्मिक क्षेत्रात सनातनी भूमिका घेता येणार नाही.
तुमचे डोके आणि हृदय यात सतत सुसंवाद असला पाहिजे. तुम्हाला एकाचवेळी एकीकडे स्वतःच्या हृदयाला संकुचित ठेवून, दुसरीकडे वैचारिक विकास, मनाची समृद्धता व राजकीय हक्क आणि अधिकाराच्या व्याप्तीचा विस्तार साधता येणार नाही.
ज्यावेळी एखादा समुदाय आपल्या हक्कांच्या मागणीसाठी लढत असतो, त्यावेळी त्याने धर्माच्या अंधश्रद्धेत जखडून राहावे आणि वाईट सामाजिक रूढींच्या शृंखलात बद्ध असावे अशी अपेक्षा करणे हे स्वप्नरंजन आहे. अशी वांझोटी स्वप्ने पाहणारांची स्वप्ने लवकरच विरून जातील".
(Ranade, Gandhi and Jinnah, Dr. B. R. Ambedkar, Page: 35 वरून उद्धृत)
पण लोकशाही पद्धत अंगवळणी पडलेली जनता हे मनसुबे यशस्वी होऊ देईल का? हा सुद्धा येथे महत्वाचा प्रश्न आहे. सध्यातरी याच उत्तर नाही असेच आहे आणि याचा जिवंत उदाहरण म्हणजे सुधारीत नागरिकता कायद्याला देशाच्या
कानाकोपऱ्यातून होत असलेला सर्वसमावेशक विरोध.

थांबा, यातच खुश होऊन गाफील बनू नका.. कारण हाच संवाद विसंवादमध्ये बदलवण्यासाठी संघोटे आणि भाजपायी कायम प्रयत्नशील दिसले आहेत. म्हणून एकीकडे ते शिवरायांचा गौरव करतात तर त्याचक्षणी त्यांची तुलना एखाद्या ऐऱ्यागैऱ्याशी करतात,
त्यांच्या बदनामीचे छुपे अजेंडे आखत असतात. यासाठी कधी ते जेम्स लेनचा वापर करतात तर कधी छिंदम चा वापर करतात. तशी ही दुभंगलेपणाची किंवा दुतोंडी वृत्ती फार जुनी आहे आणि प्रत्येक कर्मठवादी आणि कट्टर जातीवादी व्यक्तीने ते जोपासली आहे. दुर्भाग्यपूर्ण आणि जड अंतकरणाने म्हणावं लागतंय की
लोकमान्य टिळक ही याला अपवाद नव्हते. बाळ गंगाधर टिळक एकीकडे शिवरायांची जयंती साजरी करत आणि एकीकडे "शूद्र शिवाजीचा राज्यभिषेक करणारा गागाभट्ट शेवटी शौचकूपात निवर्तला" असे जाहीर प्रवचनात सांगणाऱ्या शंकराचार्यांची पाद्यपूजाही करत. ही दुतोंडी भूमिका तेच घेऊ शकतात ज्यांच्या हृदयात आणि
डोक्यात कायम विसंवाद सुरू असतो. म्हणून मी वर सांगितल्यानुसार बनारस हिंदू विश्वविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वापरलेले वाक्य इथे तंतोतंत लागू होतात की, " एका बगलेत संविधान आणि दुसऱ्या बगलेत मनुस्मृती ठेवून आपण देश घडवू शकणार नाही."
#निर्मिती
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.