कोरोना पॉजिटिव { अनुभव } ... 2 मे ला मी क्लीणीक वरून घरी आल्यावर दुपारी चेहरा मान साधारण गरम वाटत होतं, दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा अंग गरम वाटत होतं, क्रोसिन घेऊन झोप काढल्यावर 5 वाजता ताप उतरलेला एकदम फिट वाटत होतं. रात्री 11च्या आसपास परत साधारण ताप आला
दुपारी आणि रात्री ताप येण्याचा हा प्रकार 5 दिवस असाच चालू राहिला, खोकला दिवसभर नसायचा पण अधून मधून येत होता. लो ग्रेड ताप 4 दिवसात जातो , बाकी माझी तब्येत तशी एकदम चांगली होती म्हणून मी वेट अँड वॉच या भूमिकेत राहिले. या काळात पेशंटच्या अपॉइंटमेंटस् आधीच बुक केल्या असल्या कारणाने
आवश्यक ती काळजी घेऊन क्लीणीकला जाणं असायचे. दरम्यान वडिलांना सुद्धा ताप आला तेव्हा मनात शंका आली, हा कोव्हिडचा ताप तर नाही ना ? घरीच कोरोना स्वाब टेस्ट केली ....14 मे, टेस्ट च्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ला घरात ट्रेडमिल वर वॉक करताना मला एकाकेकी दम लागून गरगरल्या सारखं वाटलं
श्वास वेगाने वर खाली होत असताना छातीत थोडंसं पेन होत होते, डाव्या डोळ्याने स्पष्ट दिसत नव्हते आणि समोर दिसणारी कुठलीही व्यक्ती वा वस्तू 2 वेळा दिसायची.अशक्तपणा इतका होता की उभं रहायला सुद्धा मला जोर लावावा लागत होता. ओक्जीमीटर वर चेक केले तर रक्तातील ऑक्सिजन 95 म्हणजे काठावर होता
हा सगळा अनएक्सपेक्टेड विचित्र प्रकार आहे , आपली तब्येत बिघडतेय, पुढे वर्स्ट सिच्युएशन होऊ शकते याची जाणीव होती म्हणून मी माझी मैत्रीण डॉ सुनीताला फोन करून कळवलं .... थोडा वेळ थांबून बघते घरी, एल्स बेड तयार ठेव मी एक दोन दिवसात कुठल्याही क्षणी एडमिट होऊ शकते
कोरोनाच्या 18 दिवसातील मला हा दिवस खूपच घाबरवणारा विचार करण्यापलीकडे होता. टेस्ट रिपोर्ट 3 दिवसांनी येणार होते पण आपल्याला कोरोना तर झालाच आहे आणि न्यूमोनियाची शक्यता आहे याचा अंदाज आला होता. घरातच लिक्विड ड्रिंक नट्स सूप घेऊन आराम केला.... रात्री जेवण बेचव लागत होते
खायची इच्छासुद्धा होत नव्हती, 2 घास खाल्ले की उलट्या होत. पुढचे 2 दिवस अक्षरशः कसेतरी ढकलले. तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती.. 18 मे टेस्ट रीजल्ट येण्याचा दिवस ..दुपारी 1 ला रिपोर्ट आले. आई वडील लहान भाऊ, माझा मुलगा राज आणि मुलगी आयुश्री , घरातील कूक.… सगळे लोक पोजिटीव्ह होते
अपेक्षितच होते हे... पण खरं सांगते सिम्पट्स आणि इतर विषय सोडून द्या...आणि आपल्याला कोरोना झालाय हा विचार फक्त 2 मिनिटं करून बघा , अक्षरशा डोळ्यासमोर अंधारी येते, मेंदू सुन्न होतो .. इतकी दहशद झाली आहे कोरोना या शब्दाची ... धीर देणारी चांगली गोष्ट एवढीच होती की वडील आणि मी सोडून
बाकीच्यांना एकही दिवस लक्षणं दिसले नव्हते ते सगळे सिम्पटम फ्री होते .... माझ्या तब्येतीत खूप सुधारणा झाली होती. विकनेस पूर्ण पणे गेला होता डाव्या डोळ्याची व्हिजन नॉर्मल होऊन सगळं पूर्वीसारखं व्यवस्थित दिसत होते. ताप परत आलाच नाही. खोकला चार पाच तासातून एकदा आला तर यायचा
मात्र खोकताना छातीत थोडंसं दुखायचे आणि छाती घट्ट ( चेस्ट टाईट ) झाल्या सारखी वाटत होते . नॉर्मल श्वास घेताना काहीच वाटत नव्हते पण दीर्घ मोठा श्वास घेतला की छातीत थोडंसं पेन फील व्हायचे. लंग्स मध्ये इन्फेशन होऊन न्यूमोनिया झाल्याची कल्पना मला खूप आधीच आली होती
कोरोना विषाणू चे हल्ला करण्यासाठी लंग्स हे फेव्हरेट प्लेस असते जिथे त्याचे मल्टीप्लिकेशन जोरात होते. लंग्स हळू हळू डॅमेज झाले की श्वास घ्यायला त्रास होतो मग व्हेंटिलेटर पुढे केस क्रिटीजल होते...आमच्या floor वरचे दोन्ही फ्लॅट, पूर्ण floor आमचाच असल्या कारणाने घरा बाहेर गेलं तरी
मला कोणी बोलणारे कोणी नव्हते.. बाहेर floor च्या पायऱ्या वरखाली चढून उतरून बघितल्या तर मला 3 मिनिटांच्या वर पायऱ्या चढताना त्रास होत होता.धापा इतक्या लागत होत्या की बेडवर पालथे पडून 10 मिनिटं तोंड उघडे ठेवून श्वास घ्यावा लागत होता, मग 15 मिनिटांनी ब्रीदिंग नॉर्मल होऊन बरं वाटायचे
मला झालेला न्युमोनिया कमी स्वरूपाचा ( वॉकिंग न्यूमोनिया, चालु फिरू बोलू शकता फक्त जोर लावणारे काम केले तर दम लागणार ) सौम्य होता. पुढे क्लारिथ्रोमायसिन टॅबलेट घेतल्या आणि अँटिबायोटिक, स्टेरॉईड , injec... सलाईन द्वारे 5 दिवस घेतले. आता न्यूमोनिया बरा झाला होता.
होम क्वारंनटाईन झाल्यावर वॉर्डातील BMC डॉक्टरांशी माझं रोज दुपारी आणि रात्री 2 वेळ बोलणं होत , त्यांचे फोन 24 तास अवेलेबल असतात. त्यांच्याकडून, मला प्रत्येकाच्या 5 दिवसांचा कोर्स नुसार हायड्रॉक्लोरोविंन आणि झिंकच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या .
वडिलांचा ताप खोकला 4 दिवसात थांबला होता त्यांना क्रोसिन एजिथ्रोमाइसिन कफसिरफ, Vit C पेन्टाकाइन्ड टॅबलेट दिल्या होत्या. घरातील अन्य लोकांना सिम्पटम दिसले नाहीत, ते सिम्पट्म फ्री होते.तुम्हां सर्वांना सल्ला एवढाच देईन कोरोनाला भयंकर आजार म्हणून न बघता एक फिटनेस टेस्ट म्हणून बघा
जो पर्यत वॅक्सिन येत नाही तो पर्यँत प्रत्येकाला आज ना उद्या या फेज मधून जायचेच आहे. तेव्हा कोरोना मला न व्हावा हा विचार सोडून कोरोना मला झाला तरी मी सिम्पट्म फ्री ( 40 % लोक ) किंवा माईल्ड सिम्पट्म ( 55 % लोक ) यामध्ये असेल हा विचार करून यापूढे प्रयत्न करा
कोरोना झालेल्या आणि त्यातून बरा झालेल्या व्यक्तीला दहशदवादी सारखे वागवू नका. बाजारातील इम्युनिटी बूस्टर वगैरे औषधं घेऊन पैसे वाया घालवू नका. इम्युनिटी तेव्हाच मिळेल, जर का एकदा कोरोना झाला किंवा वॅक्सिन घेतलं तरच . लंग्स हेल्दी ठेवण्यासाठी ब्रीदिंग योगा, कार्डिओ एक्सरसाईज करा 🙏
You can follow @Madhuri47_47_47.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.