#THREAD
विषय :किल्ले सज्जनगड
सातारा,मराठ्यांची राजधानी,या शहराबद्दल एक वेगळीच आपुलकी आहे,इथे आलो कि ऐतिहासिक ठिकाणी आल्याचा भास काही क्षणातच होतो,याच शहरात परळी गावाच्या जवळ एक सुंदर किल्ला निसर्गाच्या सानिध्यात वसला आहे,तो किल्ला म्हणजे 'सज्जनगड' आज याच किल्ल्याची गडवारी
(1/26)
पुण्यापासून अंदाजे १३८ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे,साताऱ्या शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर.शहराच्या मध्यभागातून जात आपण अजिंक्यताऱ्याजवळचा बोगदा ओलांडला कि सज्जगडाच्या मार्गाला लागतो
(2/26)
.बोगदा ओलांडला कि चहू बाजूला फक्त डोंगर आणि डोंगराचं दिसतात.निसर्गाने ओतप्रोत भरलेला हा रस्ता म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच.या रस्त्याने जाता जाता आपण एका फाट्यावरून येऊन थांबतो,एक रस्ता परळी गावाला जातो तर दुसरा ठोसेघर धबधब्याला,
(3/26)
ठोसेघर चा रस्ता पकडून आपण सरळ निघून एका वळणावर येऊन पोहोचतो आणि दुरूनच आपल्याला सज्जनगडाच्या वर असलेल्या धर्मध्वजाचे दर्शन घडते आणि आपोआप ओठातून 'जय जय रघुवीर समर्थ' असे बोल निघतात.
(4/26)
सज्जनगडाच्या अगदी पायथ्या पर्यंत गाड्या पोहोचतात,श्री समर्थ सेवा मंडळांनी हा परिसर सुंदर रित्या सांभाळला आहे.अगदी वर पर्यंत जायला समर्थ भक्तांनी पायऱ्या केल्या आहेत,आपण जसे जसे वर जातो तसे तसे आपल्याला आपल्या डाव्या हाताला एक एक करत मारुतीच्या मुर्त्या दिसतात
(5/26)
.रस्त्यात ठिकठिकाणी ताक आणि लिंबू सरबत विकायला बसलेल्या लोकांचे ठेले हि दिसतात.
स्वानुभवावरून सांगतो,सज्जनगडावर मिळणाऱ्या मसाला ताकाची सर कशालाही नाही ! आणि त्या सोबत तिथल्या लोकांचा गोडवा सुद्धा कुठेही नाही
(6/26)
.ताक पिऊन आपण पुढे निघालो कि आपल्याला मुख्य दरवाजा लागतो,छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार.मागच्या वर्षी सह्याद्री प्रतिष्ठान ( @SahyadriSanstha) यांनी ह्या दरवाज्याचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा या दरवाज्याला त्याच्या वैभवशाली रूपात आणून उभे केले.
(7/26)
या वेळेला छत्रपती उदयनराजे भोसले सुद्धा उपस्थित होते.हा दरवाजा ओलांडला कि अजून एक दरवाजा लागतो आणि तो ओलांडला कि आपण थेट किल्ल्याच्या मुख्य भागात येऊन पोहोचतो.
(8/26)
आपण किल्ल्याच्या मुख्य वास्तू पाहायच्याआधी गडाचा आणि समर्थ रामदास स्वामी यांचा थोडासा इतिहास जाणून घेऊयात.ह्या किल्ल्याचे अध्यात्मिक माहात्म्य खूप मोठे आहे,कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज,समर्थ रामदास महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे तिघेही इथे कधी काळी राहिले आहेत
(9/26)
समर्थ रामदासांनी १६४८ पासून विविध ठिकाणी मारुतीरायांच्या मंदिराची स्थापना करावयास सुरवात केली,शहापूर ला पहिला मारुती स्थापन केला गेला,आणि या स्थापने नंतर रामदासी संप्रदायाची वाढ होत गेली.
असे करत करत महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यात मारुती ची मंदिरे स्थापन करण्यात आली.
(10/26)
१६४९ च्या आस पास छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास आणि रामदासी संप्रदायाचे माहात्म्य कळल्यावर त्यांनी समर्थांची भेट घेतली आणि शिंगणवाडी येथे महाराजांनी गुरूपदेश घेतला.
(11/26)
१६७३ साली परळीचा किल्ला अर्थात सज्जनगड महाराजांनी जिंकून घेतला आणि १६७६ साली तिकडे मठ बांधून समर्थ रामदास महाराजांना तिथे वास्तव्यास जाण्यासाठी सांगितले.
(12/26)
छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अनेक दिवस या किल्ल्यावर राहायला होते असे ऐतिहासिक पुरावे आहेत,
इथे संभाजी महाराज सुद्धा राहून गेले आहेत आणि या मठाच्या जीर्णोद्धाराला सुद्धा अनेक वेळेला देणगी दिल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी सापडतात.समर्थ रामदास सुमारे ६ वर्ष ह्या किल्ल्यावर राहिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये झाला आणि लगेच त्याच्या एक वर्षाने समर्थ रामदासांनी या गडावर अन्नत्याग करून समाधी घेतली,ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली तिथे आता एक मंदिर उभे आहे.
(14/26)
किल्ल्याचा इतिहास तसा मोठा आहे परंतु आत्तासाठी एवढा पुरेसा आहे.आता येउयात किल्ल्यावरील वास्तूंकडे.
दरवाजे ओलांडून आत गेलो कि आपण पोहोचतो किल्ल्याच्या मुख्य भागात,इथे थोड्याच अंतरावर आपल्या डाव्या हाताला श्रीधर कुटी दिसते
(15/26)
आणि उजव्या हाताला पेठेतील मारुती मंदिर दिसते मारुती मंदिर सुंदर आहे आणि गाभारा मोठा आहे.त्याच मंदिराच्या मग सोन तळे आहे.पुढे चालत गेलो कि आपल्या उजव्या हाताला मुख्य राम मंदिराचा परिसर दिसतो.मंदिर प्रचंड स्वच्छ आहे,आणि त्या मंदिरातील मुर्त्या खरंच सुंदर आहेत.
(16/26)
समर्थ रामदासांनी या तंजावर मधल्या एका कारागिराकडून श्री राम,लक्ष्मण आणि सीतेच्या मुर्त्या तयार करून घेतल्या होत्या.या मुर्त्या बघून प्रत्येक रामभक्त तृप्त होतो हे निश्चित.
(17/26)
मंदिराच्या बरोबर समोर भोजनशाळा आहे,इथे रोज १२ ते २ जेवढे म्हणून भाविक येतात त्यांना जेवायला वाढले जाते,गव्हाची खीर,चोळीची उसळ आणि भात असा ठरलेले भोजन असते. मी हा प्रसाद खाण्यासाठी म्हणून पुण्याहून निघालो कि मध्ये अधे काहीही न खाता इथे येतो,या जेवणाची सर कशालाही नाही.
(18/26)
"श्री राम जय राम जय जय राम" हा जप आपण जेवताना कायम चालू असतो आणि हा प्रसाद अगदी थोडाजरी खाल्ला तरी मन तृप्त करणारा असतो.जेवण करून झाले कि आपण बाहेर पडलो कि समोर आपल्याला समर्थांचा मठ पुढे दिसतो.
(19/26)
याच मठात छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदासांना दिलेला पलंग,कुबडी,पिकदाणी आणि इत्यादी वस्तू ठेवलेल्या आहेत.हि जागा पाहताना आपण खरंच time travel करून त्या काळात गेलो आहे असच वाटतं,कधीकाळी इथे महाराज असतील ते समर्थांसी गप्पा मारत असतील हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही
गडाच्या अगदी कोपऱ्यात धाब्याचा मारुतीचे मंदिर आहे,ते किल्ल्याचा शेवटचे स्थळ.या मंदिरात भीमरूपीचे फलक चारी बाजूना लावलेले आहेत,मी जेव्हा जेव्हा इथे जातो तेव्हा तेव्हा अगदी मोठ्याने हे स्तोत्र म्हणतो आणि माझी सज्जनगडाची वारी थांबवतो.
(21/26)
मंदिराच्या बाहेरच्या कड्यावरून खाली दरीत पाहताना विचार करत असताना अनेक अनेक विचारणा उर भरून येतं,आपण शिवाजी महाराज,रामदास महाराज,तुकाराम महाराज,संभाजी महाराज यांचे किती देणे लागतो हा विचार सारखा सारखा मनात येत राहतो.
(22/26)
डोळे बंद करून काही वेळासाठी विचार केल्यावर एक जिव्हारी विचार मनात येतो कि जर हे कोणी नसतेच तर आज आपण असतो का ? त्यांनी जे धर्मकार्य केलं,आपली संस्कृती जपली,देव देश धर्मासाठी आपले प्राण वाहिले त्यासाठी आपण काय करतो आहे ?
(23/26)
काही समाजकंटक निश्चित आहेत जे आपला इतिहास विकृत करायला बसलेले आहेत,पण तुम्ही आम्ही अश्या ऐतिहासिक स्थळी जाऊन अजून शंभर लोकांना प्रेरित करून तिकडे थोडीफार का होईना मदत करून आपला धर्म टिकवू शकतो आणि वाढवू शकतो हे दाखवून दिले पाहिजे.
(24/26)
रामदास महाराजांच्या आयुष्यातून प्रेरणा घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत,ज्या वेळेला तुम्हाला कधी आपल्या आयुष्यात मोठं संकट आलंय असं वाटेल तेव्हा ह्या किल्ल्याची अवश्य भेट घ्या,शिवाजी महाराज आणि रामदास महाराज इथे आहेत,ते तुम्हाला या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग नक्की सांगतील
(25/26)
तर आजची गडवारी कशी वाटली ते अवश्य सांगा,आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन थ्रेड घेऊन मी कायम येत राहीन !
बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि जय....!
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय....!
सनातन हिंदू धर्म कि जय !!!
जय जय रघुवीर समर्थ !
(26)
अक्काबाई स्वामी यांची समाधी !
या आधीच्या किल्ल्यांच्या गडवारी ची लिंक :
" #गडवारी #मल्हारवारी" https://twitter.com/i/events/1255358579000979457
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.