#LalbaugchaRaja स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासून लालबागच्या बाजारातील व्यापारी व मासळी बाजारातील कोळी भगिनींनी मिळून हा गणेशोत्सव सुरु केला. आजही गणपतीच्या मिरवणुकीत या दोन वर्गांना महत्त्वाचं स्थान असतं. २००२ पूर्वीपर्यंत ह्या गणपतीचं दर्शन सहजसोपं होतं.
+
+

किंबहुना कुठलेही पडदे वा कनाती लावून इथलं गणेश दर्शन बंदिस्त केलं गेलं नव्हतं. परंतु २००३ नंतरच्या काळात या भागातील चाळींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पुर्नविकासाचं काम मोठमोठ्या विकासकांनी हाती घेतलं आणि इथे गगनचुंबी इमारती आकार घेऊ लागल्या.
#LalbaugchaRaja
+
#LalbaugchaRaja
+

त्यामुळे इथल्या जागांना हिरेमाणकांचे भाव आले. मग इथला मूळ मुंबईकर गिरणी कामगार मध्यमवर्गीय मराठी समाज या जागा विकून रातोरात करोडपती झाला. दूरच्या पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. या कालावधीत इथे अमराठी लोकांचं प्राबल्य खूप वाढलं
#LalbaugchaRaja
+
#LalbaugchaRaja
+

यात प्रामुख्याने गुजराती व मारवाडी लोकांची संख्या मोठी होती. साहजिकच इथल्या काही सोसायटी पूर्ण शाकाहारी झाल्या. अशा स्थितीतही #LalbaugchaRaja गणेशोत्सव मंडळात मराठी लोकांचा टक्का मोठा होता. आजही आहे. परंतु भविष्यातील परिस्थिती सांगता येत नाही.
+
+

पूर्वी कसं #LalbaugchaRaja गणेशोत्सव मंडळाला वर्गणी वा देणगीसाठी लोकांकडे मिनतवाऱ्या कराव्या लागत. परंतु आता ती परिस्थिती राहिली नव्हती. सधन लोकांकडून पैशाचा ओघ सुरु झाला आणि परिणामस्वरुप गणपती बाप्पाचं व्यापारीकरण झालं.
+
+

मोठाल्या उत्पादनांच्या जाहिराती प्रवेशद्वारावर विराजमान झाल्या. या गणपतीची "नवसाला पावणारा" अशी आधीच ख्याती होती. कुठे इक्कादुक्का सिनेकलाकार यायचा. आता तिथे बाॅलीवूड कलाकार, राजकारणी, क्रिकेटर्स यांचा ओघ वाढू लागला. #LalbaugchaRaja ला ग्लॅमर लाभलं.
+
+

आधी मराठी मग हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर चोवीस तास थेट मंडपातून वार्तापत्र सुरु झालं. देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात #LalbaugchaRaja ची महती पोचली. लोकांची रीघ लागली. पार भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापर्यंत रांगा जाऊन पोचू लागल्या.
+
+

#LalbaugchaRaja गणपतीचं दर्शन म्हणजे मानाची गोष्ट झाली. देवापुढील दानपेट्या पैशांनी, नोटांनी, डाॅलर्स, पौंड, सोनं, चांदी, हिरे, माणकांनी ओसंडून वाहू लागल्या. महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत म्हणून या गणेश मंडळाचा दबदबा वाढला. या नवश्रीमंतीतून मंडळाला समाजसेवेची प्रेरणा मिळाली.
+
+

#LalbaugchaRaja समोरच्या पेरुचाळ महानगरपालिकेच्या शाळेतील दोन मजल्यांवर मंडळाने प्रशस्त वातानुकूलित अभ्यासिका, वाचनालय, संगणक सुविधा उभारुन इथल्या नाही तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मुलांना अद्ययावत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे.
+
+

अशा या #LalbaugchaRaja अभ्यासिकेत इयत्ता आठवीपासून ते थेट अभियांत्रिकी, वैद्यकीय, प्रशासकीय सेवा अभ्यासक्रमासाठी लागणारी सगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करुन दिली जातात. दरवर्षी हजारो मुलं याचा फायदा घेतात आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी होतात.
+
+

#LalbaugchaRaja गणेश मंडळ यातील बहुसंख्य सेवा विनामूल्य तर काही नाममात्र दरात उपलब्ध करुन देते. त्यामुळे या मंडळाचं सामाजिक क्षेत्रातील योगदान कायमच उल्लेखनीय राहिलंय. हा सगळा भाग म्हणजे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
+
+

#LalbaugchaRaja गणेश मंडळाच्या या समाजकार्यामुळे सेनेचा इथला बेस आणखी घट्ट झालाय. त्यामुळे यावर्षी सदर मंडळाने "आरोग्योत्सवा"ची हाळी दिली नसती तरच नवल होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेश मुर्तीचा आकार लहान ठेवून अकरा दिवस अखंड रक्तदान व प्लाझ्मादान करण्याचं ठरवलंय.
+
+

#LalbaugchaRaja मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, यात शंकाच नाही. परंतु याला दुसरी बाजू आहे आणि ती म्हणजे सेनेचा इथला प्रभाव आणखी तगडा करुन भाजपला या भागात जराही डोकं वर काढू न देणं. असो, या माध्यमातून लोककल्याणकारी समाजसेवा होणार असेल, तर मग हे राजकारण आम्हाला मान्य आहे.
+
+

#LalbaugchaRaja च्या या लोकोपयोगी उपक्रमात म्हणूनच आपण सगळ्यांनी जमेल तशी साथ देऊ. मी तर इथली माहेरवाशीण आहे. मी जाणारच. तुम्हीही या. आपण सगळ्यांनी मिळून या महान कार्याचा एक भाग बनू.
समाप्त
--- दुर्गा

समाप्त

--- दुर्गा