निर्मलवारी अभियान - माझ्या आठवणीतील वारी
' पाहू द्या रे मज विठोबाचे रूप ' असे म्हणत मुखी विठ्ठलनामाचा गजर आणि हाती टाळ मृदंगाचा तालावर नर्तन करणारे वारकरी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान ठेवलेल्या पालखी सोहळ्यासमवेत सोमवारी १६ जुलै बरड या गावी पोहचलो.
तेथे निर्मल वारीचा अनुभव घायला मिळाला. वारी मुकामाच्या प्रत्येक गावामध्ये राज्य सरकारतर्फे तात्पुरते फिरती शौचालय , वारीमध्ये स्वच्छता व त्याबद्दलचे अनुशासन यासाठी निर्माण केलेली उत्तम व्यवस्था.पालखी मार्गावरील गावामध्ये स्वछता राहावी आणि रोगराईला थारा मिळू नये.
यासाठी हा गेले काही वर्ष चालू असलेला
हा निर्मलवारी उपक्रम. वारकऱ्यांकडून , नागरिकांकडून व जेथे मुक्काम असेल त्या गावातील गावकऱ्यांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे . सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह तर अपूर्व आहे. वारीच्या बरड येथील मुक्काम प्रसंगी आम्ही अत्यावश्यक सेवा
देण्यासाठी नागरिक , गावकरी काही स्वयंसेवी संस्था , स्थानिक स्वराज संस्था , आणि इतर कार्यकर्ते सहभाग घेतला होता. या बरोबरीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे NSS चे विद्यार्थी ७० जण एकूण सुमारे १५० ते २०० जणांचा संच दि.१६ जुलैच्या रात्री पासून १७ जुलैच्या पहाटे पर्यंत वारकरी बंधु
भगिनीना शौचालय वापरासंबंधी प्रबोधन , आवाहन करीत होतो. स्थानिक कार्यकर्ते ही , गावकरी मोठ्या प्रमाणात होते. प्रातविधीसाठी गावांमध्ये शौचालयाची सोय नसल्यामुळे अनेकांना उघडयवरच शौचास बसावे लागते. त्यामुळे परिसरामध्ये विविध आजारांची लागण होत असते.
हे टाळण्यासाठी वारीमध्ये त्या त्या ठिकाणी हा ' निर्मलवारी अभियान ' उपक्रम निरनिराळ्या क्षेत्रतील राबवीत असतात.बरड येथे पालखी परिसरात एकूण ३ ठिकाणी व पंढरपूर रोडला ५ शौचालय उभारणायत आले होते .प्रत्येक ठिकाणी २० ते २५ जणांचा गट व काही फेरते कार्यकर्ते वारकऱ्यांना आवाहन,
विनंती करीत होते. यात सुमारे ९०% वारकरी बंधु भगिनींचा चागला प्रतिसाद मिळाला.संघ परिवारातील सेवा सहयोग व इतर काही सेवासंस्था गेली चार वर्ष चालवलेला हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद...!

- संकेत फडके १७/७/१८
#निर्मलवारी #सेवासहयोग #पंढरीची_वारी #माऊली #विठ्ठलविठ्ठल #मराठी #म
You can follow @The_Nationfirst.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.