पोलिस हा शब्द आपल्याकडे गर्वाने घेतला जातो. सगळे पोलिस हिरो असतात हे भारतीय समाजात ठासून भरलयं. काही काळासाठी हा चष्मा काढून एका संवेदनशील विषयावर चर्चा करूया. पोलिसी अत्याचार ( Police brutality) हा मुद्दा अस्तित्वात नसल्याचा आव आपण आणतो. जॉर्ज फ्लॉइड भारतात नाहीच...!
अनेक देशात पोलिसी अत्याचाराबाबत बोललं जातं त्यामानाने आपल्या कडे पोलिसांना बॉलिवूडने हिरो दाखवण्यात जे समाधान मानलं तेच भारतीयांच्या मनातही असते. जर कुणी पोलीस बांधव हा लेख वाचत असल्यास त्यांनी थोड्या वेळासाठी सगळे चष्मे बाजूला काढून ठेवावे. आज एका वाईट बाजूची चर्चा करूयात.
जॉर्ज फ्लॉइडच्या कस्टोडिअल डेथनंतर अमेरिकेत जी आंदोलने झाली ती आपल्या कडे होतात का? किंवा किमान अशा पोलिसांवर टिका करण्याचा अधिकार तरी असतो का? आज भारतातील पोलिसी अत्याचाराबाबत रिसर्च पेपर शोधत होतो क्वचितच यावर कुणी अभ्यास केला आहे. कारणही तसचं आहे भारतीय समाज देशभक्ती
या एका ThinLine ला बांधला गेला आहे. या समाजाला मानवी हक्कांपेक्षा देशभक्ती महत्त्वाची वाटते. त्यामुळे अशा विषयांवर डिटेल अभ्यास करणारी मंडळी अस्तित्वात नसल्यागत आहेत. पोलिसी अत्याचार भारतात पाळ्यामुळाने व्यापलेली आहे तरीही आपण तिला नाकारत असतो. खुल्यापणाने यावर बोलणाऱ्याला
देशद्रोही घोषित केले जाते त्यामुळे यावर चर्चा करणे तर फारच लांबची गोष्ट आहे. तरीही तामिळनाडू मध्ये झालेल्या अमानुष हत्येबद्दल भारतीय समाज हळूहळू बोलायला लागतोय. त्याच अनुषंगाने या समस्येवर बोलण्याची वेळही आली आहे.

पोलिसी अत्याचाराची आकडेवारी अस्तित्वात नाही,कोणताही रेकॉर्ड नाही.
Interestingly ज्या अमेरिकेत पोलिसी अत्याचाराबाबत इतके आंदोलने होतात तिकडेही याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. कँलिफोर्निया राज्याने अशी आकडेवारी आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र तोपर्यंत तेथील पोलिसी युनियने 1991 पासूनचे सगळे रेकॉर्ड्स, केसेस कचऱ्यात टाकून दिले.
त्यामुळे भारतात अशा अधिकृत आकडेवारीची अपेक्षाही करण्याची गरज नाही.विकिपीडियावर भारतातील पोलिसी अत्याचारांबाबतची मोठी लिस्ट तुम्हाला मिळेल. त्यात स्वातंत्र्याच्या आधीपासून ते कोरोनाच्या लॉकडाऊन पर्यंत पोलिसी अत्याचाराच्या किती घटना घडल्या याची डिटेल माहिती मिळेल.
अशा संवेदनशील विषयावर अधिकृत आकडेवारी देऊन चर्चाही करता येऊ नये असा हा दुर्लक्षित विषय आहे. भारतात पोलिसांना आपले अधिकार श्रीमंत/प्रबळ व्यक्तींविरूध्द वगळता इतर कोणाविरूध्दही वापरण्याची दिलेली सूट प्रमाणाबाहेर आहे. त्याचा वापर हे कसे करतात हे वेगळेपणाने सांगायची गरज नाही.
1990 च्या दशकात गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलिसांनी न्याय व्यवस्थेला बाजूला सारत कशाप्रकारे एन्काऊंटर करण्याचा सिलसिला चालू केला होता ते आजही सगळ्यांना आठवत असेल. जगातील मानवाधिकार उल्लंघनाच्या मोठ्या घटनेत याचा समावेश होतो. आता यावरही अभिमान, गर्व बाळगणारे लोकच अधिकांशाने भेटतील.
मन्या सुर्वे असो की उत्तर प्रदेशातील 42 निष्पाप लोकांना दंगली थांबवण्याच्या आरोपाखाली एन्काऊंटर असो पोलिसी अत्याचार हा काही नवीन विषय नव्हे. रेप व्हिक्टिमला या देशात न्याय मिळत नाही म्हणून instant न्याय करणारी नवी एन्काऊंटर पध्दती आता अगदी सामान्य होत चालली आहे.
पोलिसांच्या अशा गैरप्रकारांना भारतीय समाज बहुसंख्येने डोक्यावर उचलून घेतो. त्यांच्या वर फुलांची उधळण करतो पण तो यांना एक साधा प्रश्न विचारण्यास विसरतो, या घटना घडत असताना तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली होती? हा प्रश्नच कोणालाही विचारायचा नाही. मुळात कोणालाही प्रश्नच
नकोशे वाटतात. प्रश्न न विचारता एखाद्या प्राण्यांसारखा मालकाकडे पडून रहावा अशा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. संस्थांना प्रश्न विचारल्यास तुम्हाला याचे Consequences झेलावे लागतात. तुमच्या सोबत कुणीच उभा राहत नाही. कारण तो व्यवस्थेला घाबरलेला माणूस आहे.
दिल्ली दंगली वेळी चार किशोरवयीन मुले रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा कुणी आपला आवाज उठवल्याचं आठवतयं? नंतर ती मुले मेली पण आम्हाला कुठे फरक पडतोय? कारण पोलिसी अत्याचाराला गरीब, दलित, अल्पसंख्याक,कमजोर समजल्या जाणाऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.
शहरातील मध्यम वर्गीय लोकांना याचा अनुभवच नसतो त्यांना हे जग एक Fairytale दुनिया आहे आणि याला वाचवण्यासाठी पोलिसी व्यवस्था कार्यरत आहेत यावर त्यांचा विश्वास असतो. त्यांना बॉलिवूडने मनात बिंबवलेली प्रतिमा कायम ठेवायची असते. आरोपीला पोलीस मारहाण करू शकतो, कपडे काढू शकतो.
हे सगळं करू शकतो आणि हे अगदी नॉर्मल आणि गरजेचं आहे यावर हे मध्यम वर्गीय ठाम असतात. आता उच्च वर्गींयाबाबत बोलायचे झाल्यास हसू निर्माण होतो कारण त्यांना मिळणारी 5 Star Treatment, Instant Justice वगैरे privileges उपलब्ध असल्यावर त्यांना कोणती गरज आहे अशा विषयांवळ बोलायची?
पोलिसांच्या अमानुष ट्रिटमेंबद्दल कुणी बोलल्यास त्याला धमकी देणारे राजकीय पक्षही अस्तित्वात आहेत. मानवाधिकार या क्षुल्लक गोष्टी असतात हे तोपर्यंत लागू पडतं जोपर्यंत तुम्ही या व्यवस्थेच बळी ठरत नाही. जेव्हा ही व्यवस्था तुम्हाला पिळून काढेल तेव्हा पश्चाताप निर्माण होईल.
पोलिसी अत्याचार ही एक मोठी Systematic समस्या आहे यावर समाजात साधकबाधक चर्चा होण्याची नितांत गरज आहे. आपण लोकशाही देश आहोत आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीला आरोप सिध्द झाल्याशिवाय दोषी मानता येत नाही तरीही कस्टोडिअल डेथसारख्या घटना घडतात. संवैधानिक मुल्यांचा ऱ्हास होतोय.
कोणत्याही संस्थेत समस्या नाहीत हा गैरसमज दूर करा. वाईटाविरूध्द बोलायला सुरुवात करा. जेव्हा रक्षकच भक्षक बनत असतो तेव्हा तर बोलण्याची गरज आणखी वाढते.

POLICE BRUTALITY IS REAL. LET'S TALK ABOUT IT.

No you are not Anti national. Let's talk..!

___________
✍ प्रथमेश
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.