#थ्रेड
#SuperWomens

संपूर्ण जग व महासत्ता देशातील प्रमुख नेते ह्या कोरोना विरुद्ध लढा देत आहे
परंतु तरीही
कोरोनाशी लढा देणाऱ्या देशांपैकी जे सात देश अधिक यशस्वी ठरले ,त्या सातही देशांच्या प्रमुखपदी महिला आहेत.
जगात व भारतात महिला नेतृत्वाला

1/6
नेहमी काही अपवाद वगळता दुय्यम स्थान दिलं जात परंतु महिला नेतृत्व काय करू शकते याचा हा पुरावा ह्या नेत्यांनी पुन्हा जगा समोर ठेवला आहे .
जवळपास गेले अडीच महिने लॉकडाऊन करूनही, भारतासह जगभरातकोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. हा विषाणू आणि आणि हा आजार नवा असल्याने, त्याच्याशी

2/6
सामना करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धतीही
वेगळ्या आहेत पण, एक गोष्ट या जागतिक लढ्यामध्ये ठळकपणे जाणवली ती म्हणजे,कोरोनाशी लढण्यात जे सात देश यशस्वी ठरले, त्या सातही देशांच्या प्रमुखपदी महिला आहेत.हे सात देश आहेत – जर्मनी, तैवान, नॉर्वे, फिनलंड,न्युझीलंड, डेन्मार्क आणि आईसलंड.

3/6
1. न्युझीलंड च्या पंतप्रधान " जेंसीफा आर्डन "
2. जर्मनीच्या चान्सलर "अँगेला मर्केल "
3. फिनलंडच्या पंतप्रधान "सना मारीन"
4.डेन्मार्कच्या पंतप्रधान " मेट्टे फ्रीडरिकसन "
5. नॉर्वेच्या पंतप्रधान " अर्ना सॉलबर्ग "
6. आईसलंडच्या पंतप्रधान " कातरीन जेकोप्सस्तोतीर "

4/6
7. तैवानच्या पंतप्रधान " त्साई इंग वेन

आजपर्यंत आपण जे-जे नेते पहात आलो, ते सर्व शक्तिप्रदर्शन करणारे,स्वत:ची प्रतिमा उंचावणारे आणि इतरांवर दोषारोप करणारे असेच नेते पाहिले.या नेत्यांच्या तुलनेत हे महिलांचे नेतृत्व त्यांच्या निर्णायक, थेट तरी प्रेम आणि करुणेच्या भावनेतून

5/6
संवाद साधण्याच्या शैलीमुळे लक्षवेधी आणि अधिक प्रभावी ठरले .
म्हणूनच कोरोना विजयीच्या ह्या कामगिरी मुळे किमान या पुढच्या काळात तरी , आपण महिलांच्या ह्या सामर्थ्याला शासनव्यवस्थेत मानाचे स्थान देऊ , अशी आशा करूयात..

@MarathiRT
@MarathiBrain
#Superwomens
#वाचलेले
#म ✍️
You can follow @sujitppatil.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.