कचखाऊ सेनापती, दिशाहीन सैन्य = महाराष्ट्र भाजप
आपलं एम्पायर (बिझनेस एम्पायर, पॉलिटिकल, आयडियॉलॉजिकल, कोणतंही...) उभारायचं - टिकवायचं - वाढवायचं असेल तर तुम्ही हुशार, कर्तबगार असून भागत नाही. ते आवश्यक आहेच, पुरेसं नाही.
टीम पाहिजे.
आणि त्या टीमला "एम्पावर" करता आलं पाहिजे. +

त्यांना आवश्यक ते स्वातंत्र्य आणि सामुग्री पुरवता आली पाहिजे.
कारण रणांगणात उतरल्यावर युद्ध करणार नाही म्हणून चालत नसतं. शत्रू जी शस्त्रास्त्र वापरत असेल त्याच प्रकारची - किंबहुना त्याहून सॅव्हेज आयुधं वापरावीच लागतात. हे जिंकण्यासाठी वगैरेचं प्रिपरेशन नाही. कॉमन सेन्स आहे हा. +

सर्वपक्षीय राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून सदाचाराची अपेक्षा करणं किमान समज असणाऱ्यांनी सोडून दिलंय आता. जात-धर्माचं कार्ड खेळणं, शत्रुपक्षाचं मानसिक खच्चीकरण होईल असे आरोप-प्रत्यारोप हा आता "राजकारण-धर्म" होऊन बसला आहे. जो कुणी या चिखलात उतरेल, त्याने ही तयारी करून, +
त्याच पातळीवर दसपट अरे ला का रे करण्याची धमक बाळगण्याशिवाय गत्यंतर नाही.
महाराष्ट्र भाजपचं याच्या अगदी उलट आहे.
शत्रुपक्ष जितका अधिक चिखलात लोळतो, तितकी अधिक यांना स्वतःच दुधाने अंघोळ करण्याची खुमखुमी येते. +
महाराष्ट्र भाजपचं याच्या अगदी उलट आहे.
शत्रुपक्ष जितका अधिक चिखलात लोळतो, तितकी अधिक यांना स्वतःच दुधाने अंघोळ करण्याची खुमखुमी येते. +
फार नाही - दीड महिन्या आधी दिल्लीतील शिवसेनेच्या झुंझार पत्रकारांनी इंदिरा गांधी - करीम लाला संबंधांवर शब्द सुमनं उधळली. २४ तासांत पलटी मारावी लागली पक्षाला. वक्तव्यापासून पक्षाला फारकत घ्यावी लागली. ही आहे व्यक्तिस्वातंत्र्य, फ्री-स्पीच, वैचारिक मतभेदांना स्थान देणाऱ्या +
पुरोगामी पक्षांची खरी लायकी.
१० महिन्यांपूर्वी हेच पत्रकार, हाच राजकीय पक्ष एका क्रूर, खुनशी, रक्तपिपासू पक्षाबरोबर सत्तेत होता. रोजच्या रोज हीन वक्तव्यं, टिपण्यांचा रतीब घातला जात होता. पण या फॅसिस्ट, हुकूमशाहीवादी पक्षाने उफ्फ केलं नाही. "मी सामना वाचत नाही" +

असं गोड सुहास्यवदने उत्तर दिलं गेलं. परिणाम आपल्यासमोर आहे.
अर्थात, राजाने असल्या फालतू प्रकारांवर स्थितप्रज्ञ रहाणंच शोभतं. त्याने या घाणीत स्वतःचे हात बुडवू नयेत. पण राजाकडे सेनापतींची फळी असते ना? त्यांनापण युद्धात उतरवू नये? +
अर्थात, राजाने असल्या फालतू प्रकारांवर स्थितप्रज्ञ रहाणंच शोभतं. त्याने या घाणीत स्वतःचे हात बुडवू नयेत. पण राजाकडे सेनापतींची फळी असते ना? त्यांनापण युद्धात उतरवू नये? +
सतत ५ वर्षे सत्तेत सोबत असताना केली गेलेली प्रतारणा गिळून निवडणुका सोबत लढवायचा हट्ट शेवटी अंगावर कसा आला तो आता उभा महाराष्ट्र पहातोय.
गाढवही गेलं, ब्रह्मचर्यही गेलं.
ही अशी अवस्था २ प्रमुख कारणांमुळे आहे. +
गाढवही गेलं, ब्रह्मचर्यही गेलं.
ही अशी अवस्था २ प्रमुख कारणांमुळे आहे. +
पहिलं कारण म्हणे खुद्द आपल्याच सेनापतींमधील शत्रू गोटाबद्दल सहानुभूती वाटणारी फळी. दुसरं म्हणजे शत्रूचं मार्केटिंग कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या एजंटांच्या स्वीकृतीची लोचट लालसा. ही दोन्ही कारणं महाराष्ट्र भाजपचं पूर्वीपासून नुकसान करत आली आहेत. परंतु अजूनही +
त्यावर कठोर कार्यवाही झालेली नाही.
तुमच्या नेतृत्वावर, विचारसरणीवर, दैवतांवर अश्लाघ्य टीका झाली म्हणून ऑन ग्राऊंड सैन्य दातओठ खात लढतं - पण तुमचे सेनापती मात्र एकदाही तलवार काढून आरोळी ठोकत नाहीत. पलीकडे एकजण काही बोलला तर सर्वबाजूंनी आक्रमणं केली जातात. +

आणि तुम्ही या आक्रमणांमुळे दबत माघार घेता.
मोदी, फडणवीसांवर घाणेरडी वक्तव्यं केल्यावर किती जणांना माफी मागण्याची वेळ आली? किती भाजप नेत्यांनी "तुम्हाला किंमत चुकवावी लागेल" अशी भाषा बोलून दाखवण्याची हिम्मत दाखवली? आज सगळीकडे चक्क हिंसक प्रतिक्रियेच्या धमक्या दिल्या जात आहेत - +

ज्यावर, अर्थातच, त्या पक्षाच्या कृपाभिलाषेवर जीवन कंठणाऱ्या पुरोगामी, मानवतावादी, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी पत्रकार विचारवंतांनी सूचक मौन पाळलं आहे - तश्या पातळीवरील कृती तर सोडाच - करू ही नयेच - तितकी आक्रमक वक्तव्यं कधी केली गेली आहेत का भाजपकडून? +
ज्या पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची होणारी अश्लील प्रतारणा थांबवली जाऊ शकत नाही, त्याने आपलं सैन्य सुरक्षित ठेवण्याचा विश्वास कसा द्यावा बरं?! +
अहो तुमच्याविरुद्ध विविध माध्यमांत खोट्या बातम्या पेरणाऱ्यांवर साधी fir दाखल करू शकत नाही तुम्ही...! "तक्रार दाखल" चे फोटोज शेअर करून समाधान करून घेता...! fir च होत नाही...मजबूत आर्थिक दंड, शिक्षा वगैरे बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या! +
बरं हे सगळं करायला तुमच्याकडे आक्रमक सेनापती "नाहीतच" असं अजिबात नाही. भरपूर आहेत. त्यांना मोकळीक देणं, त्यांना संघटनेत योग्य वापरून घेणं, त्यांना कुमक पुरवणं इतकंच आवश्यक असतं. बाकी त्यांचं ते बघून घेतात. +
अहो फेसबुक-ट्विटरवर शुन्य राजकीय ओळखी व समर्थन असलेले पोट्टे त्वेषाने लढतात तुमच्यासाठी. अधिकृत पदाधिकारी का नाही लढणार?
लढतीलच - तुमची स्वतःची लढायची इच्छा हवी. +
लढतीलच - तुमची स्वतःची लढायची इच्छा हवी. +
तुमची इच्छा नाही. त्यामुळे सेनापती कच खातात. सैन्य दिशाहीन रहातं.
एम्पायर कसं उभं रहाणार? कसं टिकणार? कसं वाढणार?!
: ओंकार दाभाडकर
[email protected]
@threadreaderapp please unroll.
एम्पायर कसं उभं रहाणार? कसं टिकणार? कसं वाढणार?!
: ओंकार दाभाडकर
[email protected]
@threadreaderapp please unroll.