नोकरीत मन का लागत नाही ?
Job Satisfaction नाही, कामामधे रस नाही, नोकरी करायची म्हणून करतो, जॉब करतो रे पण मन लागत नाही, का जन्माला आलोय असं वाटत ऑफिसमधे ? असे खूप सारे प्रश्न माझ्यासारख्या ९० च्या दशकात किंवा त्यादरम्यान जन्मलेल्या ब-याच तरुण मुलांना मुलींना पडतात. (1)
त्यामागचं सर्वात जास्त जाणवलेल कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय. मी IT मधे गेली 5 वर्षे काम करतोय त्या अनुषंगाने हे मुद्दे मांडलेत.
१. Henry Ford आणि Frenderick Taylor ह्या दोघांनी जेव्हा Assembly Line चा शोध लावला त्यामागची त्यांची धारणा अशी होती की जास्तीत जास्त Surplus-वाढावा (2)
हवा असेल तर कामगारांचे मन आणि शरीर एकत्र आले नाही पाहिजे किंवा कृती आणि विचार कामाच्या ठिकाणी एकत्र येऊ नयेत.
२. हेच तत्त्व भारतीय IT Companies साठी लागू आहे. सर्व प्रमुख भारतीय IT कंपन्या Service based आहेत, म्हणजे तुरळक अपवाद वगळता त्यांचे स्वत:चे असे products नाहीत (3)
उदा. SAP, JAVA, PYTHON etc. आपण फक्त वरील softwares शिकून बाहेरच्या देशांतील client साठी काम करतो.
शिवाय हे कामही शेकडो तुकड्यांमधे विभागलेले असते.
बहुसंख्य IT नोकरदारांची सामाजिक जाणीव बोथट होण्याचे हेच प्रमुख कारण आहे. (4)
३.बहुधा IT नोकरदारांना पूर्ण Systems माहिती होतील अशा प्रकारची कामाची रचना नसते. म्हणजे जास्तीत जास्त लोक Work Flow मधे एका छोटाश्या प्रोजेक्ट मधे एकच विशिष्ट काम करतात. खूपच कमी लोकांना योगायोगाने किंवा इतर कारणांनी वेगळ्या प्रकारचे काम मिळते. मात्र ते आवडीचे असेलच असे नाही. (5)
४. आपण केलेलं काम Manifest नसेल होत तर एक प्रकारची निराशा वाढत जाते. मग एकतर आपण निर्मितीक्षम छंदांकडे आकर्षित होतो, स्वत:चा व्यवसाय असावा असे वाटते अथवा स्पर्धापरिक्षा इ मार्ग. वरील निराशेला योग्य outlet नाही मिळाल तर मग मात्र Depression येऊ शकते. (6)
५. काहीवेळा आपण नवीन कंपनी शोधतो, पगारवाढीत समाधान मानतो.
याशिवाय बेरोजगारीची भिती, खोट्या सामाजिक प्रतिष्ठा, एका vacancy साठी हजारो applications (स्पर्धा), नोकरी नसली तर लग्न नाय, प्रेयसी नाही, प्रतिष्ठा नाही. (7)
म्हणजे भूक आणि वासना ह्या दोन्ही गोष्टी की ज्या नैसर्गिक आहेत, तिथेच मेख मारलेली असते समाजात. अशावेळी भूक आणि वासनेची तात्कालिक पूर्तता याला इथं प्राधान्य दिल जातं आणि मूळ समस्या दुर्लक्षित राहते. (8)
६. वर मांडलेल्या मुद्द्यांमधे समस्या ही आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याची अर्थव्यवस्था आपण नीट आणि चौकसपणे समजून घेतलेली नसते. उदा. भारतातील ब-यापैकी IT ची कामे ही आपण स्वस्त labourforce पुरवतो म्हणून आलेली आहेत. (9)
त्यातील बरीच कामे Clerical असतात आणि महत्त्वाची कामे client ज्या देशातील आहे तिथेच पूर्ण केली जातात, जास्तीत जास्त आपल्याकडचा एखादा onsite ला गेलेला team member असू शकतो त्यात. भारतातल्या team कडे Leftover चच काम येतं..त्याची कारणे बरीच आहेत (पण ती इथे महत्त्वाची नाहीत). (10)
अशावेळी एखाद्याला वाटू शकते की मला काहीच आव्हानात्मक काम मिळत नाही, कारकुनीला अर्थ नाही, उगीच शिकलो एवढं etc.
७. पण जर ही गोष्ट वेळीच कळाली कदाचित अशा गोष्टींनी येणारं नैराश्य कमी होईल किंवा आपण त्यातून मार्ग काढू शकतो. मूळ मुद्दा हाच आहे की, (11)
आपण जिथे काम करतो ती व्यवस्था कशी चालते हे समजून घ्यावे.
ही व्यवस्था वाईट असो किंवा चांगली, ती तशी आहे हे जर आपण मानसिकदृष्ट्या स्विकारलं तर आणि तरच आपण यातून मार्ग काढू शकतो. (12)
आपल्या क्षेत्राची Market Economy & Key Stakeholders समजून घ्या. त्यानुसार स्वत:च्या करियरचे निर्णय तोलून मापून घ्या.. आपल्या करियर मधे होणा-या ब-याच गोष्टी बाह्य बदलांमुळे होतात हे कळाल तर बरेच मानसिक, सामाजिक, आर्थिक तिढे सुटतात.
(End)
You can follow @C_D_Jagadale.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.