#थ्रेड
आज #Musicday च्या निमित्ताने व माझ्या bio मध्ये #तबला असा उल्लेख अन त्या विषयी थोडे ज्ञान असल्याने हा थ्रेड लिहतो आहे😃

विषय- #तबल्यातील_घराणी

पेपर मध्ये एखादा वादक,शास्त्रीय संगीतकार
निधन पावतो त्यावेळेस ते या घराण्याचे होतो असा उल्लेख केला जातो.👇
घराणे हा नेमका प्रकार काय ते बघू

घराणे-हा शब्द व्यावहारिक भाषेतील "घराणे" या शब्दाशीच साधर्म्य दाखवतो.पिढ्यान पिढ्या चालत आलेली विशिष्ट प्रकारची शैली व रचना.

तबला वादनात प्रमुख ६ घराणी आहेत
*दिल्ली घराणे
*बनारस घराणे
*लखनौ घराणे
*फारुकाबाद घराणे
*अजराडा घराणे
*पंजाब घराणे
👇 #म
वाजवण्याची एक विशिष्ट पद्धत व स्वतंत्र विचारप्रणाली प्रत्येक घराण्यात महत्वाची ठरते.
यावरून तबल्यात 2 बाज आहेत.

"बाज" म्हणजे वाजवण्याची पद्धत

१ बंद बाज- मर्यादित नादाची आस(आवाज)
२ खुला बाज- नादाची आस जास्त,पखवाजाचा प्रभाव जास्त असल्याने पंजा व बोटांचा वापर
👇
1)दिल्ली घराणे-संस्थापक -सीधारखॉ ढाढी

हे सर्व घराण्यातील आद्य घराणे.18 व्या शतकात उदय.यात तर्जनी व मध्यमा या 2 बोटांचा वापर होतो.म्हणून 2 उंग्लियो का बाज असेही म्हणतात.
#तिट #तिरकिट हे या बाजातील प्रमुख बोल
या घराण्यात विस्तारक्षम रचना असते. पेशकार ,कायदा,रेला यांची विपुलता.
👇
2)बनारस घराणे- संस्थापक- पं.रामसहाय

हे लखानौ घराण्याचे खलिफा मोधू खा यांचे शिष्य.यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली
या घराण्यातील वादक प्रचंड मेहनती व इच्छाशक्तीपूर्ण असतात
यांनी वेगाला प्राधान्य दिले आहे.यात एक सौन्दर्यपूर्ण नदाचा अनुभव येतो.
3)लखनौ घराणे- संस्थापक-मियाँ बक्षुजी/मोदू खॉ

हे खुल्या बाजातील आद्य घराणे.परब बाज असेही म्हणतात.नाजूक व जोरदार बोल निर्माण करण्याची क्षमता.कथक नृत्यसाठी उपयोगी.
या बाजात #धीटधीट #तागेतट हे बोलसमूह दिसून येतात.👇
4) फारुखाबाद घराणे-
संस्थापक -हाजीविलयात अली खॉ साहेब

खुल्या बाजातील लखनौ हे आद्य घराण्याचे हे शागिर्द घराणे होय.सर्वसमावेशक किंवा रचना व निकस वैशिष्ट्य या बाबतीत सुवर्णमध्य गाठणारे आहे.दिल्लीच्या तुलनेत या घराण्याचे कायदे मोठे असतात यांना "लंबछड" कायदा असे म्हणतात.👇
5) अजराडा घराणे -
संस्थापक -कल्लू खॉ मेरू खॉ
उ.प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील आजराडा गावावरून हे नाव पडले या घरान्यात कायद्यांच्या रचना त्रश्र जातीत केल्या जात.
👇
6)पंजाब घराणे -संस्थापक -लाला भवानी दास

पंजाबच्या तबल्यावर पखवाजाची छाप आढळून येते.खुले बोल बंद करून वाजवण्याची नवी शैली निर्माण केली. गत चक्रधार, क्‍लिष्ट लयकारी वाजवले जाते.दिपचंदी हे या घराण्याचे वैशिष्ट्य.
तबला या विषयी लिहण्यासारखे भरपूर काही आहे.हि प्रत्यक्षात कृतीतूनच शिकण्याची कला आहे.परंतु तबला या विषयी निदान बेसिक माहिती जी उपयोगी पडू शकते या दृष्टीने हे लिखान केले आहे.😃
@Annu_kadle @ShivajiSSRG 👆
@CatalystVoid @Omkara_Mali
@arvindgj
You can follow @Shivrajjadha_v.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.