#Time_management
Time management बद्दल संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया.
तुम्ही कधी खालील गोष्टीचा विचार केला आहे का? -
१)काही लोकांकडे खुप काम करुनही वेळ शिल्लक राहतो
२)काही लोकांना वेळ पुरतच नाही त्यांची सतत धावपळ चालू असते ?
Time management बद्दल संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया.
तुम्ही कधी खालील गोष्टीचा विचार केला आहे का? -
१)काही लोकांकडे खुप काम करुनही वेळ शिल्लक राहतो
२)काही लोकांना वेळ पुरतच नाही त्यांची सतत धावपळ चालू असते ?
पहिल्या कॅटेगरी मधील लोकांकडे कामं कमी असतात असं नाही, पण त्यांना वेळेचं महत्त्व समजलं आहे आणि वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं हे ते शिकले आहेत.

दुसऱ्या कॅटगरी मधील लोकांकडे अनुभवाची कमतरता समजा किव्हा कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यावा हे त्यांनी ठरवलेले नसू शकते. किव्हा ते खूप जास्तीच काम करत असतील की जे त्याच्या शरीराला घातक ठरू शकते.

Time management कसे करावे हे समजावून घेणे सोपे आहे पण कठीण आहे ते अंमलात आणणे. कामाचे स्वरूप ठरवून त्यानंतर कोणते काम , कधी करायचे याचे नियोजन केले पाहिजे कोणत्या कामाला अगोदर प्राधान्य दिले पाहिजे आणि हा वाचवलेला वेळ तुमच्या कुटुंबाकरीता, नविन काही शिकण्यासाठी वापरावा.

कोणी श्रीमंत घरात जन्माला येतो तर कोणी गरीब घरात जन्म घेतो. कोणी जन्मतःच हुशार असतो तर कुणाला मेहनतीने हुशार व्हावं लागतं. पण एक गोष्ट देवाने गरीब-श्रीमंत अशा सर्वांना२४ तासच वेळ दिली हे देवाने दिलेले २४ तास आपण कसे वापरतो त्यावरुन आपण आयुष्यात कीती प्रगती करु शकणार हे ठरत असतं

काही लोक १८-१८ तास काम करत आहेत तरीसुद्धा ते अर्थव्यवस्था मजबूत करू शकले नाहीत. याचा अर्थ असा होतो त्यांच्याकडे वेळेचे व्यवस्थापन नाही किव्हा कोणत्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे ते अजून त्यांना समजले नाही.कदाचित त्यांच्याकडे निर्णय क्षमतेचा सुद्धा अभाव असू शकतो.

म्हणूनच मित्रांनो, #वेळ हा आपल्याकडे असलेला सगळ्यात मोठा आणि महाग स्त्रोत आहे. एकदा वाया घालवलेला वेळ कधीच परत येणार नाही आणि जास्तीचा वेळ कधी साठवून ठेवता येणार नाही. तर हा अमुल्य #वेळ योग्यप्रकारे कसा वापरायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

पुढील थ्रेड मध्ये Time managaement बद्दल सखोल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. https://twitter.com/AtulAmrutJ/status/1274002795981504515?s=19