भाग -3
सध्या बेरोजगारी वाढण्यामागचे कारण ऑटोमेशन देखील आहे. एका बाजूला जीडीपीत वाढ होते पण त्याप्रमाणात रोजगार निर्मिती होत नाही. ऑटोमेशन वर विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. जर ऑटोमेशन याच पद्धतीने चालू राहिले तर संपत्तीचे केंद्रीकरण होईल.
संपत्तीचा महापूर आला तरी तो मोजक्याच लोकांकाध्ये राहील. आणि उर्वरित समाजाची क्रयशक्ती शिल्लक न राहिल्याने हि व्यवस्था कोसळून पडेल. मोठा मासा लहान माश्याला गिळतो त्याप्रमाणे मोठ्या उद्योजकांसमोर लहान उद्योजक स्पर्धेत टिकू शकणार नाहीत.
जो शेतकरी कापूस निर्माण करतो तो त्याच्या आयुष्यात एकदाही ब्रँडेड कपडे घालू शकत नाही
शेतकर्यांबद्दल कोरडी सहानुभूती अनेक लोक दाखवतात पण त्यांच्या मुलभूत समस्यांची चिकित्सा करावी असे लोकांना का वाटत नाही? पूर्वी हातमाग होते ते जावून यंत्रमाग आले, आता ते जावून ऑटोलूम्स आल्या.
त्यासाठी लागणारी गुंतवणूक जास्त पण स्पर्धेत टिकायचे तर बदल करण्याशिवाय पर्याय नाही.
ज्यांची गुंतवणूक करण्याची कुवत नाही ते आज न उद्या स्पर्धेतून बाद होतील. ज्यांनी बदल केला व ऑटोलूम्स टाकल्या त्यांची स्पर्धा देखील इथे संपात नाही.
चीन ने त्यांच्या पेक्षा स्वस्त दारामध्ये त्यांच्या पेक्षा उत्तम दर्जाचे कापड बाजारात आणले. बेरोजगारीची चिकित्सा न करता बेरोजगारीला उठसुठ सरकारला जबाबदार धरणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेण्यासारखे आहे.
शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांची मुले शेती सोडून शहरांकडे गेली.नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या खर्या पण त्यालाही एक मर्यादा होती. परराज्यातून देखील लोक रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आले. पुण्या- मुंबई सारख्या शहरात राजस्थानी लोकांनी किराणामाल, आईस्क्रीम,स्वीट्स,मोबाईल शॉपी,
तर उत्तर भारतीयांनी बांधकाम क्षेत्र, बिहारी लोकांनी प्लंबिंग, बंगाली लोकांनी सेन्ट्रिंग, कानडी लोकांनी मेसनरी वर्क, केरळी लोकांनी टायर्स आणि बेकरी, उडीसातील लोकांनी कारचे डेन्टिंग व पेंटिंग, ईशान्य भारतातील लोकांनी चायनीज खाद्य पदार्थ असे अनेक उद्योग मराठी लोकांच्या हातून गेले.
परप्रांतीय लोकांचे कामाचे तास सकाळी ८ ते रात्री १० व काही प्रमाणात मोनोपली असल्याने त्यांनी आपल्या भागातील तरुणांना व्यवसायात स्थिर करण्यास मदत केली.
मग बेरोजगार मराठी मुलांचा मोर्चा स्पर्धा परीक्षांकडे वळला. नोकरी लागण्यासाठी जागा कमी आणि स्पर्धा जास्त असल्याने तिथेही निराशा.
ग्रामीण भागातील तरुण नोकरीसाठी स्थानिक पुढार्यांच्या पुढे मागे करू लागले. बेरोजगारीमुळे काही तरुण व्यसनाधीन झाले. हे सर्व दुष्टचक्र आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही मुलभूत सुधारणा व्यवस्थेत घडवून आणण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी लोकांनी वरवरच्या मलमपट्टी ऐवजी मुलभूत सुधारणांसाठी सरकारच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
आता इंजीनिअर्स बेरोजगार होत आहेत म्हणून मिडिया रोज चर्चा करतो आहे. काही मुठभर लोकांच्या हिताची व्यवस्था आपण इतके वर्ष चालवत आहोत.भारतातील शहरी लोक असे मानून चालले होते कि हे इथून पुढे अनेक वर्षे असेच चालू राहील. आणि अजून गतीने वाढेल.
शेअर मार्केट अजून तेजी घेईल. परंतु हि व्यवस्था आता पूर्वी चालली तशी आता चालू शकणार नाही हे सत्य मान्य करण्याची वेळ आली आहे.
उर्वरित माहिती पुढील भागात घेऊ..
भाग - 2
https://twitter.com/Pnayan3/status/1273839649761316864?s=19

#बेरोजगारी #अर्थव्यवस्था #आर्थिकमंदी #म
You can follow @Pnayan3.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.